अकोला : चोहट्टा बाजारमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको!
अकोला, 10 ऑक्टोबर (हिं.स.) : अकोला-अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास रस्ता बंद राहिला असून वाहतूक कोंडी झाली. शेतकऱ्यांच्या प्रमुख माग
अकोला : चोहट्टा बाजारमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको!


अकोला, 10 ऑक्टोबर (हिं.स.) : अकोला-अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास रस्ता बंद राहिला असून वाहतूक कोंडी झाली.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सरसकट कर्जमुक्ती, प्रति हेक्टर ५० हजार रुपये आर्थिक मदत, फार्मर आयडीची अट रद्द करणे, ओला दुष्काळ जाहीर करणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, तसेच शेती मालावरील जीएसटी रद्द करण्याच्या मागण्या होत्या.

मुर्तीजापूर आणि अकोला तालुके नुकसानग्रस्त यादीतून वगळल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या तालुक्यांचा समावेश न झाल्यास मुंबई-नागपूर महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून, रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांच्यासह शेतकरी बांधवांना दहिहंडा पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande