चिपळूण पालिकेतर्फे एलईडी टीव्हीद्वारे उपक्रमांची माहिती
रत्नागिरी, 10 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूणच्या नागरिकांना नगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांची आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, यासाठी चिपळूण पालिकेत एलईडी टीव्ही बसवण्यात आला आहे. या टीव्हीवर योजना, चालू प्रकल्प आणि नागरिकांसाठी उपयुक्त म
चिपळूण पालिकेतर्फे एलईडी टीव्हीद्वारे उपक्रमांची माहिती


रत्नागिरी, 10 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूणच्या नागरिकांना नगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांची आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, यासाठी चिपळूण पालिकेत एलईडी टीव्ही बसवण्यात आला आहे. या टीव्हीवर योजना, चालू प्रकल्प आणि नागरिकांसाठी उपयुक्त माहिती दाखवली जात असल्याचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भोसले म्हणाले, विविध कामांसाठी दररोज शेकडो नागरिक नगर परिषदेत येतात. अनेकदा मला भेटण्यासाठी त्यांना थांबावे लागते. अशा वेळेत त्यांना पालिका राबवत असलेले उपक्रम आणि योजना समजाव्यात, तसेच त्यातून ते स्वतःसाठी व शहरासाठी काय करू शकतात, याचा विचार करावा, या उद्देशाने दालनाबाहेर हा एलईडी टीव्ही बसवण्यात आला आहे.

सध्या या स्क्रीनवर पालिकेचे उपक्रम, कामांची छायाचित्रे आणि माहिती दाखवली जात असून, लवकरच नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे व मार्गदर्शनदेखील प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चिपळूण पालिकेमार्फत शहरात करण्यात आलेली विविध विकासकामे आणि उपक्रम आता स्लाईड शोद्वारे नागरिकांना पाहता येणार आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण, नारायण तलावाचे सुशोभीकरण, अश्वारूढ पुतळा, शहरातील १२ ठिकाणी उभारलेली ओपन जिम्स, उद्यानांची देखभाल आणि मैदानांची कामे यांचा समावेश आहे.

याशिवाय ‘वाचू आनंदाने’, ‘सायकल डे’, ‘रत्नक्षारे’ आणि ‘वैभवशाली चिपळूण’ ही प्रकाशने, स्वच्छता अभियान, क्रीडा स्पर्धा आणि विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही स्क्रीनवर दाखवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande