जळगाव, 11 ऑक्टोबर, (हिं.स.) - पाचोऱ्यामधील भाजप नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांना अज्ञाताने मोबाईलवर धमकी देत ३० लाखांच्या खंडणीची केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सन २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमन नावाच्या व्यक्तीने सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधत त्याची टीम त्यांच्या निवडणुकीसाठी काम करेल, असे सांगितले होते. त्यानंतर संबंधिताने पुन्हा संपर्क साधून आता आमच्या टीमला विरोधकांचे काम करण्याची वेळ आली असल्याचे सांगून तो सूर्यवंशी यांच्या विरोधात काम करत राहिला.
सप्टेंबर २०२५ मध्ये, अमन याने पुन्हा फोन करून सूर्यवंशी यांना धमकी दिली की, जर त्यांनी ३० लाख रुपये दिले नाहीत, तर तो त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या चौकशी यंत्रणांकडे तक्रार करण्याची आणि सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिली. यावर वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अमन नावाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८ (१) व ३०८ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर