अकोला, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
पोलीस स्टेशन माना येथे फिर्यादी अनिल रामदास साबळे वय ५५ वर्ष रा. राजनापुर खिनखिनी ता. मुर्तिजापुर जि. अकोला यांचे जबानी रिपोर्ट वरून अप क २४५/२५ कलम ३०५ (अ), ३३४(१), बीएनएस अन्वये गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयातील फिर्यादी याचे गोठ्याचा टिन वाकवुन टिपातुन गोठ्यात प्रवेश करून लहान मोठया चित-या बित-या रंगाच्या ८ बक-या किंमत अंदाजे ५६,००० रू व एक बोकड काळया रंगाचा वय २ वर्ष किंमत अंदाजे ७,००० रूपये असा एकुण ६३,००० रूपये चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाणे चोरून नेल्याबाबत जबानी रिपोर्ट दिला होता.
सदर गुन्हयाचे तपासात गुन्हयाचे घटनास्थळाचे आजूबाजूला तसेच गावापासून बरेच अंतरावर कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते तसेच अज्ञात आरोपीबाबत कोणतीही तांत्रिक माहीती उपलब्ध होत नसल्याने माना पोलीसांनी तपास कौशल्याचा वापर करून त्यांची गोपणीय यंत्रण सक्रिया करून अज्ञात आरोपी बाबत अकोला, वाशिम व अमरावती जिल्हयातून गोपणीय माहिती काढली असता माना पोलीसांना गोपणीय माहिती मिळाली की, ग्राम टाकरखेड शंभु ता भातकुली जि अमरावती येथिल आरोपी नामे अजिम शाह कलीम शाह उर्फ बबलु वय ३५ वर्ष रा टाकरखेड याने सदरचा गुन्हा केला आहे. आरोपीचे ताब्यातुन चोरीला गेलेल्या ०९ बक-या पैकी ०७ बक-या किमत ४९,००० रूपये व आरोपीने सदरचा गुन्हा करतांना वापरलेले टाटा एस कंपनीचे वाहन क्रमांक एमएच ३८ ई १०५८ ज्याची किंमत ४,००,००० रूपये असा एकूण ४,४९,००० रूपयाचा मुददेमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे