कोल्हापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
मिरजेत सापडलेल्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा म्होरक्या कोल्हापुरात पोलीस हवालदार असलेला इब्रार इनामदार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस सेवेत असूनही त्याने चहा विक्री करणारी कोल्हापुरात सिद्धकला चहा नावाची कंपनी काढली. या कंपनीचे ऑफीस थाटले. कंपनीच्या ब्रँडच्या नावाखाली फ्रँचाईजी दिल्या. आणि कोल्हापूरातील ऑफीसमध्ये मात्र चक्क बनावट नोटाच छापल्या. या बनावट नोटा खपवण्यासाठी एजंट नेमले. एका एजंटाने या बनावट नोटा मिरजेत खपवण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण टोळीच मिरज पोलीसांच्या जाळ्यात अडकली. ५ जणांच्या या टोळीकडून सव्वा कोटींच्या नोटांसह मशीनरी साहित्य जप्त केलंय.
गांजा तस्करी प्रकरणात तुरुंगात असलेला राहुल जाधव याने
सहकारी कैद्यांकडून बनावट नोटा छपाईचे ज्ञान घेतले. पोलिस असलेला मित्र इब्रार इनामदार याला त्याने ही आयडिया दिली. इब्रार याने चहा व्यवसायातील भागीदार असलेल्या नरेंद्र शिंदे यास बनावट नोटाच्या उद्योगात भागीदार होण्यासाठी तयार केले. त्यानंतर गेले सहा महिने दोघांनी सिद्धकला चहाचे कार्यालय असलेल्या ठिकाणी कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर, प्रिंटर आणून राहुल जाधव सोबत या पोलिस इनामदार याने आपल्या सिद्धकला चहा कंपनीच्या दुकानात बनावट नोटा छपाई' सुरू केली. पोलिस खात्यात नोकरी, चहा विक्रीचा जोड धंदा, या धंद्याच्या आडाने बनावट नोटांची छपाई. पोलिस खात्याच्या अनुभवातून बाळगलेली सावधगीरी यामुळे सहा महिने हा व्यवसाय बिनबोभाट चालला.
चहा कंपनीच्या नावाखाली बनावट नोटांचा उद्योग सुरू झाल्यानंतर या नोटा खपवण्यासाठी सुप्रीत देसाई यास दोघांनी हाताशी धरले. सुप्रीत हा इब्रार व नरेंद्र शिंदे यांच्याकडून २५ हजारांत एक लाख किमतीच्या बनावट नोटा खरेदी करीत होता. पुढे तो ५० हजारांना १ लाखाच्या नोटांचे वितरण करीत होता.
मिरजेत गांधी चौक पोलिस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना दोन बनावट नोटा सापडल्यानंतर त्याचे वितरण सुप्रीत हा करीत असल्याचे समजले. बनावट नोटा विक्री करणाऱ्या सुप्रीत याच्याकडून नोटा खरेदी करण्यासाठी पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकाद्वारे संपर्क साधून सापळा रचून
या टोळीकडून छापण्यात येणाऱ्या बनावट नोटा मुंबईत वितरित करण्यासाठी सिद्धेश म्हात्रे याला टोळीत घेतल्याचे पोलिसांना समजले. सिद्धेश म्हात्रे यास इस्लामपूर येथे सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीतून तब्बल १ कोटी १८ लाखाच्या लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या.
इब्रार इनामदार हा आजारी रजा घेऊन गेला महिनाभर सिद्धकला चहा कंपनीच्या कार्यालयात नोटा छापण्याचा उद्योग करीत होता. इब्रार इनामदार, पोलिसांनी अटक केली असून, खात्यांतर्गत कारवाईची शिफार केली आणि इब्रार इनामदारला पोलिस खात्यातून बडतर्फ केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar