नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.) अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलने शतक झळकावले. गिलने शानदार खेळी केली. आणि कोणत्याही अडचणीशिवाय धावा काढल्या आणि संघाला मजबूत धावसंख्या गाठण्यास मदत केली. यासह गिलने विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
कर्णधार म्हणून गिलची ही दुसरी कसोटी मालिका आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली होती. गिलने त्याच्या पदार्पणाच्या मालिकेत फलंदाजीने खळबळ उडवून दिली होती.
कर्णधार म्हणून गिलचे हे पाचवे कसोटी शतक आहे. जे कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करते. गिलपूर्वी, एका कॅलेंडर वर्षात पाच शतके करणारा कोहली एकमेव भारतीय कर्णधार होता. कोहलीने एकदा नाही तर दोनदा ही कामगिरी केली आहे. कोहलीने २०१७ आणि २०१८ मध्ये प्रत्येकी पाच शतके झळकावली होती. गिलने २०२५ मध्ये ही कामगिरी केली आहे. गिलने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या मालिकेत चार शतके ठोकली आहेत.त्यापैकी एक द्विशतक होते.
अहमदाबाद कसोटीत त्याने अर्धशतक झळकावले, पण त्याला शतक पूर्ण करण्यात अपयश आले होते. गिलला अजूनही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावरील मालिका बाकी आहे. आणि त्याच्याकडून आणखी शतकांची अपेक्षा केली जाऊ शकते. गिलने या डावात नाबाद १२९ धावा केल्या. त्याने १९६ चेंडूंचा सामना केला आणि १६ चौकार आणि दोन षटकार मारले.
टीम इंडियाने आपला पहिला डाव पाच बाद ५१८ धावांवर घोषित केला. रोस्टन चेसने ध्रुव जुरेलला बाद करताच गिलने डाव घोषित केला. भारताकडून यशस्वी जयस्वालनेही १७५ धावा काढत शानदार खेळी केली. वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचा विचार करता, त्यांच्यासाठी ही धावसंख्या बरीच जास्त आहे. भारताला पुन्हा एकदा डावाने जिंकण्याची संधी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे