अमरावतीत अवैध वाहतूकीवर आरटीओ विभागाची धडक कारवाई
अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।अमरावती विभागातील महामार्ग, राज्यमार्ग तसेच ग्रामीण रस्ते मार्गावर गेल्या काही महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक व परवाना अटी शर्तीचा भंग करणाऱ्या प्रवासी वाहन, स्टेज कॅरेज च्या नियमाचा भंग करणाऱ्या प्रवासी बसेस वर मोटार
अवैध प्रवासी वाहतुकीवर  आरटीओ विभागाची धडक कारवाई


अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।अमरावती विभागातील महामार्ग, राज्यमार्ग तसेच ग्रामीण रस्ते मार्गावर गेल्या काही महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक व परवाना अटी शर्तीचा भंग करणाऱ्या प्रवासी वाहन, स्टेज कॅरेज च्या नियमाचा भंग करणाऱ्या प्रवासी बसेस वर मोटार वाहन कायदा व नियमाचे उल्लंघन केल्याने विविध गुन्हा खाली कारवाई करण्यात आली आहे. अमरावती ते मोर्शी, वरुड ते पांढुर्णा, मुलताई रस्त्यावर चालणाऱ्या स्टेज कॅरेज प्रवासी बसेस वर तसेच परतवाडा ते अंजनगाव, आकोट मार्गे अकोला, परतवाडा ते धारणी या मार्गांवरील धावणाऱ्या बसेस वर देखील कार्यवाही करण्यात आली. यामध्ये विनापरवाना, कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परवाण्याच्या शर्तीचे भंग करणाऱ्या, जादा भाडे आकारणाऱ्या, वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्या बसेस ची तपासणी करण्यात आली. यात दोषी वाहना वर कार्यवाही करण्यात आली. १६ डिसेंबर २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत ४२९ वाहने तपासली गेली असून त्यापैकी १४३ दोषी ठरली. या कालावधीत एकूण ७,७०,७५० रुपये इतके तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तर १ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या तीन महिन्यांत ३९६ वाहने तपासून १३२ दोषी वाहनांवर ७,२७,२५०रुपये इतके दंडात्मक शुल्क आकारण्यात आले आहे.अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याकरिता ही मोहीम या पुढेही सुरू राहणार असून दोषी बस मालक व चालकां विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल तसेच सणासुदीच्या काळात रस्ते वाहतूक सुरक्षा व ज्यादा भाडेवाढ या अनुषंगाने तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी या वेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande