सोलापूर - केक कापून वाढदिवस; सात जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। युवा कार्यकर्त्यांमध्ये वाढदिवसादिवशी तलवारीने केक कापण्याचे फॅड वाढत आहे. असाच प्रकार सोलापूर शहरात घडला. तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला, तसेच बाईक रॅली काढल्याबद्दल सातजणांविरोधात सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन
सोलापूर - केक कापून वाढदिवस; सात जणांवर गुन्हा दाखल


सोलापूर, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। युवा कार्यकर्त्यांमध्ये वाढदिवसादिवशी तलवारीने केक कापण्याचे फॅड वाढत आहे. असाच प्रकार सोलापूर शहरात घडला. तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला, तसेच बाईक रॅली काढल्याबद्दल सातजणांविरोधात सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील साठे-पाटील वस्ती येथील विजय साठे याचा 4 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी विनापरवानगी बाईक रॅली काढली. त्यानंतर साठे -पाटील वस्ती येथे वाढदिवस साजरा करताना तलवार फिरवत दहशत निर्माण केली, तलवारीने केक कापला. त्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील शिपाई दीपक साळुंखे यांनी फिर्याद दिली. शहर पोलिस आयुक्तालयाने 26 सप्टेेंबर रोजी लागू केलेल्या प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन केले. विनापरवानगी बाईक रॅली काढली. तलवारीने केक कापत दहशत पसरवल्याबद्दल विजय साठे याच्यासह प्रदीप सिद्राम संगटेकर, प्रशांत शिंगे, करण शिंदे, भैया पोळ यांच्यासह दोनजणांविरोधात सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कुतवळ करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande