न्यूझीलंडविरुद्धचा मायदेशातील कसोटी मालिकेतील पराभव कधीही विसरणार नाही - गंभीर
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.)गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर मिळालेला कसोटी मालिकेतील पराभव कधीही विसरणार नाही. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला होता. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच
गौतम गंभीर


नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.)गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर मिळालेला कसोटी मालिकेतील पराभव कधीही विसरणार नाही. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला होता. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला ०-३ असा पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकू शकला नव्हता. या पराभावामुळे टीम इंडियाला २०२३-२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचता अपयश आले होते, असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले .

गंभीर सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दिल्लीत आहे. त्यांनी सांगितले की, ते न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभव कधीही विसरणार नाही. जर एखाद्या संघाला खरोखरच जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकायचे असेल तर त्याने केवळ मायदेशात नव्हे तर परदेशातहशही वर्चस्व गाजवले पाहिजे.

गंभीर म्हणाले की, घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवणे ही एकमेव गोष्ट आहे. मला वाटते की, परदेशातही वर्चस्व गाजवणे तितकेच महत्त्वाचे आहे. या तरुण संघाने ती कामगदिरी करुन दाखवली आहे. इंग्लंड दौरा कदाचित आमच्यासाठी सर्वात कठीण परीक्षा होती. एक तरुण, अननुभवी संघ इंग्लंडला गेला होता. आणि या संघाने चांगली कामगिरी केली. निकाल महत्त्वाचा नाही. पण त्यांनी दररोज ज्या पद्धतीने लढा दिला तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. म्हणूनच, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी आम्हाला घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. कारण जर तुम्ही फक्त घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले तर तुम्ही जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकण्यास पात्र नाही.

न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतील पराभवाबद्दल विचारले असता, गंभीर म्हणाले की, ही आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील ही एक घटना आहे जी ते आयुष्यभर सोबत घेऊन जाणार आहेत. गंभीर आपल्या संघाला त्या पराभवाची आठवण करून देण्यावर विश्वास ठेवतात आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला, परिस्थिती काहीही असो, कधीही हलके घेऊ नये यावर भर देतात. गंभीर म्हणाले, मला वाटत नाही की, मी माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत ते कधीच विसरेन. मी ते विसरू नये. आणि मी मुलांनाही ते सांगितले आहे.

गंभीर म्हणाले, पुढे पाहणे महत्वाचे आहे. पण कधीकधी भूतकाळ लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आहे, कारण जर तुम्ही भूतकाळ विसरलात तर तुम्ही गोष्टींना गृहीत धरू लागता. तुम्ही कधीही काहीही गृहीत धरू नये. न्यूझीलंडविरुद्ध माझ्यासह सर्वांना वाटले की, आपण त्यांना पराभूत करु. पण तेच वास्तव आहे, तोच खेळ आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande