नांदेड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।
काही लोकांना तर माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री नांदेडचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना टोला लगावला.
नांदेड जिल्हा हा महाराष्ट्रातील टॉप टेन जिल्ह्यांमध्ये असला पाहिजे ही माझी भावना आहे आणि त्यासाठीच मी काम करतो. त्यामुळे अशा प्रकारांना मी महत्त्व देत नाही आणि त्याने मला काही फरकही पडत नाही, असे सांगत चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर पलटवार केला.
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रताप पाटील चिखलीकर हे सातत्याने अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात ऊस उत्पादकांना भाव जाहीर करण्याच्या दिलेल्या चिखलीकर यांच्या आव्हानावर
सातत्याने चिखलीकारांकडून अशोक चव्हाण यांना टार्गेट केले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
अशोक चव्हाण यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. चिखलीकर यांचे नाव न घेता 'माझे नाव घेतल्याशिवाय काही लोकांना जेवण जात नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे'. येणाऱ्या निवडणुकीच्या काळात असे प्रकार आणखी वाढतील. मात्र याने आपल्याला काहीही फरक पडत नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि महाराष्ट्राच्या टॉप टेन यादीमध्ये समावेश हे आपले उद्दिष्ट असून खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं म्हणणाऱ्यांच्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. असे चव्हाण म्हणाले
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis