चंद्रपूर, 12 ऑक्टोबर, (हिं.स.)।
अनुसूचित जमातीच्या यादीतील घुसखोरी करण्याचा आरोप करीत त्या विरोधात गोंडवाना परिक्षेत्रातील आदिवासी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा जंगोम महामोर्चा आयोजित करण्यात आला. मोर्चाची सुरूवात स्थानिक अंचलेश्वर गेट परिसरातील कोनेरी तलावातून होणार आहे. या मोर्चात खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, माजी आमदार राजु तोडसाम आदींसह आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव