नाशिक - वस्त्रांतरगृह पाडकामास सुरुवात
नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। , : रामतीर्थावरील वस्त्रांतरगृह पाडकामास सुरुवात झाली. भोवताली पत्रे लावून पोकलनच्या सहाय्याने दक्षिणच्या बाजूने इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली. भोवतालचा परिसर या कामामुळे प्रतिबंधित करण्यात आला आहे. कामामुळे रामत
नाशिक - वस्त्रांतरगृह पाडकामास सुरुवात


नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

, : रामतीर्थावरील वस्त्रांतरगृह पाडकामास सुरुवात झाली. भोवताली पत्रे लावून पोकलनच्या सहाय्याने दक्षिणच्या बाजूने इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली. भोवतालचा परिसर या कामामुळे प्रतिबंधित करण्यात आला आहे. कामामुळे रामतीर्थ गोमुखाकडील बाजू स्नानासाठी बंद करण्यात आली.

रामतीर्थावर भाविक श्रद्धेने स्नान व धार्मिक विधी करण्यासाठी येत असल्याने त्यांची कायम वर्दळ असते. त्यात महिलांची संख्या जास्त असते. महिलांनी स्नान केल्यानंतर वस्त्र बदलण्यासाठी हे वस्त्रांतरगृह १९९२ ला बांधण्यात आले. तेव्हापासून ते काहींना काही कारणांनी चर्चेत राहिले. रामतीर्थात उगवत्या सूर्याची किरणे पोचण्यात वस्त्रांतरगृह अडथळा ठरत आहे. त्यामुळे पावित्र्य धोक्यात आल्याने वस्त्रांतरगृह पाडण्याची मागणी होती. मागील दोन कुंभमेळ्याच्या कामांच्या वेळीही ते पडण्याची मागणी झाली होती. स्मार्टसिटीच्या कामातही वस्त्रांतरगृह पाडण्याचा प्रस्ताव होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande