लातूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। मी शेतकरी किंवा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. अशा शब्दात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला असा शब्द त्यांनी उच्चारला होता त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे
जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा या ठिकाणी बँकेच्या उद्घाटन प्रसंगी गेलो असताना ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने बोललो. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोकुळ दूध संघासारखी व्यवस्था करावी लागेल. दहा दिवसांमध्ये पैसे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रपंचासाठी पैसे कमी पडत नाहीत.
अर्बन बँक असो किंवा पतसंस्था यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करत असतो. मी देखील शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विधानाबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
जे लोक कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजकारण करतात त्या अनुषंगाने मी बोललो होतो. यामध्ये माझा कुठेही शेतकरी बांधवांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. मी देखील शेतकरी आहे ; कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
----------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis