सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाविकांच्या सेवा-सुविधांच्या कामांना गती द्यावी - डवले
त्र्यंबकेश्वर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी कुंभेमळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सेवा-सुविधांच्या कामांचे आराखडे निश्चित करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालक सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाविकांच्या सेवा-सुविधांच्या कामांना गती द्यावी  डवले


त्र्यंबकेश्वर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

आगामी कुंभेमळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सेवा-सुविधांच्या कामांचे आराखडे निश्चित करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालक सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

पालक सचिव श्री डवले यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित कामांची पाहणी केली आणि नगरपरिषद त्र्यंबकेश्वर येथे आयोजित बैठकीत कुंभमेळा कामांचा आढावा घेतला. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र राज्य पायभूत सुविधा विकास महामंडळाचे, व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित. महाराष्ट्र राज्य पायभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष कुमार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील,महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, उपायुक्त राणी ताटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पुरातत्व विभागाचे उपसंचालक अमोल गोटे, उप विभागीय अधिकारी (त्र्यंबकेश्वर), डॉ.पवन दत्ता, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, तहसीलदार गणेश जाधव, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आयोजित आढावा बैठकीत एस. के. डी. ओ, इंजिनियर्स स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड व इंटरफेम डिझाईन असोसिएट्स पुणे या तीन संस्थांनी कुंभमेळा अनुषंगाने तयार केलेल्या त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

पालक सचिव श्री डवले यांनी मंदिर परिसर, कुशावर्त, दर्शन पथ, संगम, प्रसाद व पूजा शेड, आखाड्यांचे अमृत शाही मार्ग बस स्टँड पार्किंग, बेजे येथील उपसा सिंचन प्रकल्प जागेची पाहणी केली.

००००००

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande