जळगावच्या रेशीम कोष व्यापाऱ्याला बीडमध्ये लुटले
बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। जळगावहून बीडच्या बाजार समितीमध्ये रेशीम कोष घेऊन येणार्‍या एका व्यापार्‍यास अज्ञात चोरट्याने अडवून त्याला कोयत्याचा धाक दाखवत खिशातील 15 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार जालना रोडवरील संगम हॉटेलच्या समोर घडला.

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक तुकाराम महाजन (42) व्यवसाय शेती रा. पातोंडा, ता. चाळीसगाव, जि. जळगाव हे छत्रपती संभाजी महाराज चौकाचे पुढे बीड कुर्ला जाणार्‍या रोडवर जात असताना त्यांना एका अनोळखी इसमाने त्यांच्या गाडीला गाडी आडवी लावून त्यांची लुटमार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दीपक महाजन हे बीड मध्ये रेशीम कोश विकण्यासाठी आले असता, शहरातील संगम हॉटेल पासून नवीन मोंढा रोडने रेशीम खरेदी मार्केट कडे जात असताना, छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या पुढे बीड कुर्ला जाणार्‍या रोडवर एका अनोळखी इसमाने त्यांना गाडीवर वेगात येऊन त्यांच्या इको या चारचाकी गाडीला गाडी आडवी लावत आरोपीने त्याच्या हातातील कोयता त्यांच्या गळ्याला लावून त्यांच्याकडील 15000 रुपये रोख बळजबरीने लुटमार करत घेऊन गेला.

म्हणून त्या अनोळखी इसमाबाबत बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे बीड ग्रामीणचे सपोनि दराडे करत असून बीड ग्रामीण पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

 rajesh pande