बीड, 12 ऑक्टोबर, (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात मुप्टा शिक्षक संघटनेतर्फे मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यात आगामी होणारा पदवीधर निवडणूक संदर्भात मुप्टा संघटनेतर्फे पदवीधर नोंदणी संदर्भात मराठवाड्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येत आहे.
याअनुषंगाने आज बीड येथे मा.आ. अमरसिंहभैय्या पंडित मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.यावेळी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांची संवाद साधला.याप्रसंगी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ.संभाजी वाघमारे, कार्याध्यक्ष डॉ.भास्कर टेकाळे प्राध्यापक शिक्षक बंधू मोट्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis