नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गिरनार पर्वतवरील गुरु गोरक्षनाथ महाराज मंदिरातली मूर्तीची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेचा ओम नमो सद्गुरू संन्याशी आखाडा चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धपीठ श्री मच्छिंद्रनाथ महाराज तपोभूमी मंदिर (अंजनेरी), श्री समाधेश्वर महादेव मंदिर (इंदिरानगर) यांसह नाथसेवकांनी निषेध व्यक्त करण्यात आला.
विटंबना प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन नाथसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रवीणनाथ महाराज, योगी अश्विनी नाथजी महाराज, हेमंत नाईक, जितेश शार्दुल, तुषार भालेराव , हर्षद पगारे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV