बाळासाहेब देवरस यांचे पुतणे सेवानिवृत्त न्या. अनंत देवरस यांचे निधन
मुंबई, 12 ऑक्टोबर (हिं.स.) - मध्यप्रदेश येथील सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनंत दिवाकर देवरस यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. मृत्यूसमयी ते 99 वर्षांचे होते. आणीबाणीच्या संदर्भातील जस्टीस शहा कमिशनमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. संघाच
अनंत दिवाकर देवरस


मुंबई, 12 ऑक्टोबर (हिं.स.) - मध्यप्रदेश येथील सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनंत दिवाकर देवरस यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. मृत्यूसमयी ते 99 वर्षांचे होते. आणीबाणीच्या संदर्भातील जस्टीस शहा कमिशनमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे पुतणे होते. तसेच नागपूरचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू चंद्रकांत उपाख्य बाबा देवरस यांचे वडील बंधू होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande