कोल्हापूर - करनूरमधील समरजीत घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांचा मुश्रीफ गटात प्रवेश
कोल्हापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। करनूर ता. कागल येथील समरजित घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केला आहे. यामध्ये आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या का
मंत्री हसन मुश्रीफ घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना


कोल्हापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

करनूर ता. कागल येथील समरजित घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केला आहे. यामध्ये आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.

ग्रामपंचायत सदस्य सतीश धनगर, विठ्ठल धनगर, गणपती धनगर, बाळू धनगर, सोमा धनगर, कृष्णात धनगर, रामा धनगर या कार्यकर्त्यांनी समरजित घाटगे यांच्या कारभाराला कंटाळून मुश्रीफ गटात प्रवेश केला आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मानसन्मान ठेवला जाईल असे सांगितले .

यावेळी रंगराव पाटील, वजीर नायकवडी, महमद शेख, रावसाहेब चौगुले, तानाजी कुंभार, इम्रान नायकवडी, प्रवीण कुमार कर्णिक, संभाजी पाटील, सौ . संगीता जगदाळे, बाळासाहेब पाटील, बाबुराव धनगर, विश्वास चव्हाण, सुरेश परीट, काकासो चौगुले, समीर शेख, राजमहमद शेख, बाळासो धनगर, राजू शेख, युवराज शिंदे, शिवाजी गुरव, दयानंद कांबळे, दादासो कदम, विक्रांत कोरे, भगवान चव्हाण, शरद चव्हाण, जयवंत चव्हाण, रामराव भोसले, रोहित पाटील, नागेश जमदग्नी, वैभव गुरव, संभाजी नलवडे, शैलेश कांबळे, कृष्णात धनगर, रोहन पाटील, गणेश घुणके, निसार शेख, तौसिफ शेख, शौकत शेख, उदय पाटील, अल्ताफ शेख, निहाल शेख, प्रदीप जगदाळे, सौरभ पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande