मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या सन्मानार्थ 100 किमी सायक्लोथॉन, 250 जणांचा सहभाग
मुंबई, 12 ऑक्टोबर (हिं.स.) - राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) 26 व्या विशेष संमिश्र गटाने (एससीजी) 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखवणारे अशोक चक्र प्राप्त मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईत रविवारी (12 ऑक्टोबर) स
सायक्लोथाॅन


मुंबई, 12 ऑक्टोबर (हिं.स.) -

राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) 26 व्या विशेष संमिश्र गटाने (एससीजी) 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखवणारे अशोक चक्र प्राप्त मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईत रविवारी (12 ऑक्टोबर) सायक्लोथॉनचे आयोजन केले.

गेटवे ऑफ इंडिया येथून सकाळी 7 वाजता सुरू झालेली ही सायक्लोथॉन नवी मुंबईमधून प्रवास करत 100 किलोमीटर अंतर पार करत पवई येथील एनएसजी कॅम्प येथे समाप्त झाली. या कार्यक्रमात एनएसजीचे कर्मचारी, नागरिक, तसेच आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांसह 250 हून अधिक सायकलस्वारांनी सहभाग घेतला.

सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबद्दल जागरूकतेसाठी या मार्गावर पथनाट्य सादर करण्यात आली. याद्वारे निरोगी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा संदेश देण्यात आले.

प्रचाराचा एक भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) वैद्यकीय पथके, 13 आणि 14 ऑक्टोबर, 2025 रोजी मुंबईतील शाळांना भेट देऊन गर्भाशयाच्या कर्करोगाचा प्रतिबंध आणि आरोग्याविषयी जागरूकता यावरील संवादात्मक सत्रे आयोजित करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande