कोल्हापूर - काॅ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तावडे, काळे, कळसकर यांना जामीन मंजूर
कोल्हापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)कोल्हापूर येथील काॅ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंच कडून जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे या
कोल्हापूर - काॅ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तावडे, काळे, कळसकर यांना जामीन मंजूर


कोल्हापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)कोल्हापूर येथील काॅ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंच कडून जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी हा निकाल दिला.या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना वर्ष २०१८ मध्ये कोल्हापूर येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर झाला, तरी ते डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात जामीन न मिळाल्याने पुणे येथील कारागृहात होते.

डॉ. तावडे यांची डॉ. दाभोलकर प्रकरणात १० मे २०२४ या दिवशी निर्दोष मुक्तता झाल्यावर ते कारागृहाबाहेर आले होते. यानंतर डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन कोल्हापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांनी १६ जुलै २०२४ या दिवशी रहित केला होता. अखेर १४ ऑक्टोबर २०२५ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचकडून जामीन मंजूर झाला.

या प्रकरणात एकूण १२ संशयित असून मुंबई उच्च न्यायालयाकडून कॉ. पानसरे हत्या प्रकरणी संशयित सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भरत कुरणे, अमित बद्दी आणि वासुदेव सूर्यवंशी यांना या अगोदरच जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड यांनाही या अगोदरच जामीन मिळालेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande