औसा येथे अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई; 8.54 लाखांचा मुद्देमाल जप्त‌
लातूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या चार व्यक्ती विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत 8 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त‌ करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची औसा येथे कारवाई केली ग
अ


लातूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या चार व्यक्ती विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत 8 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त‌ करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची औसा येथे कारवाई केली गेली.

पथकाला मिळालेल्या माहितीवरून औसा पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पान मसाल्याची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या ठिकाणावर छापेमारी करण्यात आली. याप्रकरणी चार आरोपींन विरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे 02 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण 08 लाख 54 हजार 495 रुपयाचा गुटखा व पानमसाल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वाखाली केली गेली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande