सोलापूर - कंदरमध्ये अवैध वाळू जप्त; दोघांवर गुन्हा
सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)उजनी जलाशयाच्या कंदर येथील नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपासा करून वाळूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. टेम्पो व वाळू जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई ग्राम महसूल अधिकारी गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
सोलापूर - कंदरमध्ये अवैध वाळू जप्त; दोघांवर गुन्हा


सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)उजनी जलाशयाच्या कंदर येथील नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपासा करून वाळूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. टेम्पो व वाळू जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई ग्राम महसूल अधिकारी गोरक्षनाथ यशवंत ढोकणे यांनी पहाटे केली.

नितीन हनुमंत कदम, सुनील ऊर्फ भाऊ दिलीप माने (रा. कंदर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ग्राम महसूल अधिकारी ढोकणे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी पहाटे कंदर येथील उजनी जलाशयात अवैध वाळू उपास होत असल्याची माहिती फोनद्वारे दिली

माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी पोलीस शिपाई निकम, पोलीस गुटाल, लोकरे आणि महसूल सेवक नागेश पवार यांना बरोबर घेऊन कंदर येथे गेलो असता, काही वेळातच भांगे वस्तीकडून कंदरच्या दिशेने एक टेम्पो दिसला. त्यात विना परवाना अवैध वाळू साठा साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. टेम्पोची अंदाजे दोन लाख रुपये आणि दोन लाख दहा हजार किमतीची सव्वा ब्रास वाळू जप्त केली. दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande