पुणे - नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
पुणे, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याच्या विरुद्ध दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घायव
पुणे - नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल


पुणे, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याच्या विरुद्ध दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घायवळ हा २०२० पासून दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावर असलेले सीमकार्ड वापरत असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणूक, माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच टेलीकम्युिनेकशन ॲक्ट २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार झालेला गुंड नीलेश घायवळ हा युरोपात असल्याची मााहिती मिळाल्यानंतरपोलिसांकडून त्याला ब्लू काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधला आहे. घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्या प्रकरणी घायवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande