सोलापूर - अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची गव्हाणे विरुद्ध तक्रार
सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)कुर्डूवाडी येथील अवताडे वसाहतीत राहणाऱ्या एका दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीला ओंकार गव्हाणे, बाबू शेख, आदेश गायकवाड यांनी फूस लावून घरातून पळवून नेले म्हणून त्यांच्या विरोधात पोस्को अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्या
सोलापूर - अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची गव्हाणे विरुद्ध तक्रार


सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)कुर्डूवाडी येथील अवताडे वसाहतीत राहणाऱ्या एका दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीला ओंकार गव्हाणे, बाबू शेख, आदेश गायकवाड यांनी फूस लावून घरातून पळवून नेले म्हणून त्यांच्या विरोधात पोस्को अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अवताडे वसाहत येथे राहणारी 33 वर्षीय महिलेने दिली आहे. यातील संशयित आरोपी ओंकार गव्हाणे हा अठरा वर्षे पूर्ण नसलेल्या एका अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता तसेच इन्स्टाग्रामवर ‌‘आय लव्ह यू‌’ असे म्हणून मुलीबरोबर अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने राहत्या घरातून तिला फूस लावून पळवून नेले असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास कुर्डूवाडीचे पोलीस निरीक्षक सचिन शिंदे हे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande