ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहली लंडनहून भारतात परतला
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर (हिं.स.)टीम इंडिया १९ ऑक्टोबरपासून एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. भारतीय संघ १५ ऑक्टोबर रोजी दिल्लीहून रवाना होणार आहे. संघातील काही क्रिकेटपटू सकाळी आणि तर काहीजण संध्याकाळी रवाना होणार आहेत.
विराट कोहली

विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतात परत आला आहे. विराट मंगळवारी सकाळी लंडनहून दिल्लीला पोहोचला. विराटने या वर्षी ९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने आधीच टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.म इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि पाच टी२० सामने खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी ऍलेडमध्ये आणि तिसरा सामना २५ ऑक्टोबर रोजी सिडनीमध्ये खेळला जाईल. त्यानंतर पाच सामन्यांची टी२० मालिका होईल. टी२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.विराट कोहलीने १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यापूर्वी २९ जून २०२४ रोजी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. विराटने एकदिवसीय सामन्यांमध्ये ५१ शतके झळकावली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

 rajesh pande