नाशिक, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा क्रिकेट असोसिएशनची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय - तर्फे होणाऱ्या २३ वर्षांखालील महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या सी के नायडू ट्रॉफी सामन्यासाठी निवड झाली आहे हे सर्वांना माहित आहेच. १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान हा चार दिवसीय सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे. गुरुवार पासून सुरु होणाऱ्या या सामन्यासाठी आज मंगळवारी सौराष्ट्र व महाराष्ट्र या दोन्ही क्रिकेट संघांनी सकाळच्या सत्रात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर कसून सराव केला.
सरावा दरम्यान दोन्ही संघांच्या व्यवस्थापक व प्रशिक्षक यांनी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे एकूण मैदानातील व इतर सर्व व्यवस्था , सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या खेळपट्ट्या या व इतर सगळ्याच सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. दरम्यान सामन्याच्या तयारीसाठी उभारण्यात येत असलेला पॅव्हेलियन समोरील मांडव इत्यादी व्यवस्था जवळ जवळ पूर्ण होत आली आहे.सोमवारी नाशिक मध्ये दाखल झालेल्या सौराष्ट्र संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे :- रक्षित मेहता - कर्णधार, प्रणय थापा भाग्यराज चुडासामा- यष्टीरक्षक, ध्येय मेहता, हर्षवर्धन राणा देव डे, राज वाघेला - यष्टीरक्षक, रामदेव आचार्य - यष्टीरक्षक, मौर्य घोगरी-चंद्रराज राठोडमर्विन जाविया फुलेत्रा, हितेन कांबी-तीर्थराज जडेजा मित अम्बालीया, कृष्णा बबारीया- दक्ष भिंडी मुख्य प्रशिक्षक – राकेश ध्रुव ,सहाय्यक प्रशिक्षक – वीरेंद्र वेग्दा , सहाय्यक प्रशिक्षक – अमित शुक्ला ,स्ट्रेंग्थ व कंडीशनींग कोच - विशाल वसोया , फिजियो – कमलेश वढेर . संघ व्यवस्थापक – हरेद्र जानी
गेल्या शनिवार पासून नाशिकमध्ये सराव करत असलेल्या महाराष्ट्र संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे : सचिन धस - कर्णधार, दिग्विजय पाटील - उपकर्णधार, अनिरुद्ध साबळे्नीरज जोशी, अनुराग कवडे - यष्टीरक्षक, किरण चोरमाळे ,साहिल औताडे ,शुभम मैड अब्दुस सलाम, राजवर्धन हंगर्गेकर, वैभव दारकुंडे ,स्वराज चव्हाण -अजय बोरुडे , अभिषेक निषाद, हर्ष मोगवीर- निखिल लुनावत मुख्य प्रशिक्षक - निरंजन गोडबोले , सहाय्यक प्रशिक्षक - निखिल पराडकर , गोलंदाजी प्रशिक्षक - अनुपम संकलेचा, स्ट्रेंग्थ व कंडीशनींग कोच - विनोद यादव , क्षेत्ररक्षण प्रशिक्षक - मोहसिन सय्यद , स्ट्रेंग्थ व कंडीशनींग कोच - विनोद यादव फिजियो - संदीप गायकवाड , संघ व्यवस्थापक - मोहमद पूनावाला आदींचा समावेश आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV