सोलापुरात एमडी ड्रग्ज पुरविणारा तरुण जेरबंद
सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील मोहसीन इस्माईल शेखसह इतरांना एमडी ड्रग्ज पुरविणाऱ्या तरुणाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत (मंगळवारी) पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याचा मोबाईलही जप्त केला आहे. फिरोज ऊर
सोलापुरात एमडी ड्रग्ज पुरविणारा तरुण जेरबंद


सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील मोहसीन इस्माईल शेखसह इतरांना एमडी ड्रग्ज पुरविणाऱ्या तरुणाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत (मंगळवारी) पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याचा मोबाईलही जप्त केला आहे. फिरोज ऊर्फ मस्तान रसूल शेख (रा. परंडा, जि. धाराशिव) असे त्या तरुणाचे नाव आहे.

सोलापूर शहर व शहराजवळील गावांमध्ये काही तरुण एमडी ड्रग्जचा पुरवठा करीत होते. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाकणी फाट्याजवळ चौघांना पकडले होते. तत्पूर्वी, ‘सकाळ’मध्ये एमडी ड्रग्जसंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यावर अवैध व्यावसायिक सावध झाले होते. त्यांनी पुरवठा बंद केला होता.

पण, काही दिवसांनी पोलिसांचा अंदाज घेऊन त्या तरुणांनी पुन्हा त्याचा पुरवठा सुरू केला होता. त्यावेळी ग्रामीण पोलिसांनी कलबुर्गी व सोलापूर शहरातील चौघांना जेरबंद केले होते. या गुन्ह्याच्या तपासाअंती शहरातील आणखी चौघे अडकले. काहींना जामीन मिळाला, पण ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरूच ठेवला. सोलापुरातील तरुणांना एमडी ड्रग्ज पुरवठा करणारा कोण, याचा शोध पोलिस घेत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande