सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)तुमच्या मुलाला पोलिसात भरती करतो म्हणून सुमारे अकरा लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली. अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात ठाण्यात दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीशैल काशीनाथ कुंभार (वय ६३, धंदा-मंजुरी, रा. कुंभार गल्ली, अक्कलकोट) यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोज विष्णू कोकणे व भारती मनोज कोकणे (रा. प्लॅट नं.९, मुंबादेवी आर्केड, बी-विंग, दिवे, ठाणे) अशी संशयितांची नावे आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेऊन फसवणूक केल्याची घटना माहे मे २०२४ ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधी दरम्यान गुरुमाउली हॉटेल सध्या (मजगे हॉस्पिटल अक्कलकोट येथे घडली.मे २०२४ ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधी दरम्यान संशयित आरोपी मनोज कोकणे व त्याची पत्नी भारती या दोघांनी मिळून फिर्यादीचा मुलगा रमेश श्रीशैल कुंभार याला मुंबई शहरमध्ये पोलिस भरती करतो असे आश्वासन देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. अकरा लाख रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक करून अपहार केला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बागाव हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड