बीडच्या कारागृह अधीक्षक गायकवाड यांची नागपूरला उचलबांगडी
बीड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड कारागृहातील कैद्यांचे सक्तीने धर्मांतर करण्याच्या प्रयत्नांचा आरोप असणाऱ्या कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची नागपूरला उचलबांगडी करण्यात आली आहे बीडच्या कारागृह अधीक्षक म्हणून नेमणूक झाल्यापासून या ना त्या कारणा
अ


बीड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।

बीड कारागृहातील कैद्यांचे सक्तीने धर्मांतर करण्याच्या प्रयत्नांचा आरोप असणाऱ्या कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची नागपूरला उचलबांगडी करण्यात आली आहे

बीडच्या कारागृह अधीक्षक म्हणून नेमणूक झाल्यापासून या ना त्या कारणाने पेट्रस गायकवाड कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिले. कारागृहातील झाडे तोडणे, कैद्यांकडून खासगी कामे करून घेणे असे आरोप त्यांच्यावर होते. यासोतच तुरुंगातून सुटलेल्या एका आरोपीच्या दाव्यानुसार तुरुंगात सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असून खुद्द कारागृह अधीक्षकच त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा सनसनाटी आरोप संबंधित आरोपीने केला होता

बीड कारागृहातील कैद्यांच्या वकिलांनी तक्रारी केल्या होत्या. गृह विभागाने तत्काळ दखल घेऊन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची उलचबांगडी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची अवनती (डिमोशन) करून त्यांची नियुक्ती नागपूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande