बीड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।
धारूर पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि वाहनधारकांमध्ये शिस्तबद्धतेची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून वाहतूक विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत टोल नाका, धारूर येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाकाबंदी करण्यात आली. या कारवाईत २२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून ₹२२,७०० इतका दंड वसूल करण्यात आला.
तसेच नाकाबंदीत १६ वाहनांवर कारवाई करून ₹९,२०० चा दंड वसूल करण्यात आला.याशिवाय, मोटार वाहन कायदा कलम १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) अंतर्गत एक प्रकरण नोंदविण्यात आले आहे.
या संपूर्ण मोहिमेत पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरी, शेख, काळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis