छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आला
भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी गंगापूर तालुक्यातील आगरवडगांव येथे जनसेवक गणेश मुरलीधर पा.चव्हाण यांच्या भव्य जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला.या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गावागावातील जनतेच्या समस्या जाणून घेणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचविणे आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क राखणे, हा मुख्य उद्देश आहे. असे आमदार बंब यांनी सांगितले.या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे मान्यवर पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय हे केवळ राजकीय केंद्र नसून, जनतेच्या सेवेसाठी सदैव खुले असलेले एक प्रेरणास्थान ठरणार आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis