रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड हेही यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी