छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)सहकारी संस्थांच्या मालमत्ता विक्रीसाठी उपनिबंधकांची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. सहकारी संस्थांच्या मालमत्तांची विक्री करण्यासाठी तालुका उपनिबंधक कार्यालयाची वा त्या कार्यालयाने नेमलेल्या प्रशासकाची पूर्वपरवानगी अनिवार्य असल्याचे तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे.
अनेक सहकारी संस्थांची मालमत्ता, जमीन, प्लॅट इ. अनियमित, बेकायदेशीर विक्री केलेबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभुमिवर तालुका उपनिबंधक यांनी कळविले आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अन्वये नोंदणीकृत सहकारी संस्थाची मालमत्ता, जमीन खरेदी – विक्री प्रकरणांच्या बाबत उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र, पूर्वपरवानगी असल्याशिवाय तसेच या कार्यालयाने नेमलेला अवसायक, प्रशासक, प्राधिकृत अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र तसेच या कार्यालयाची पूर्व परवानगी असल्याशिवाय अशा मालमत्तेची खरेदी – विक्री करण्यात येऊ नये, असे आवाहन तालुका उपनिबंधक विलास कोळेकर यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis