छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।
काही गट आणि विशेष करुन तृतीयपंथी एकट्याने किंवा एकत्रितपणे एकत्र येऊन लग्न, किंवा इतर धार्मिक प्रसंगी किंवा जन्म- मृत्यू इत्यादी ठिकाणी, सणासुदीच्या प्रसंगी किंवा विशिष्ट धार्मिक कार्यात किंवा कुटुंबातील जन्म-मृत्यू प्रसंगी जाऊन पैशांची मागणी करतात.
तसेच ट्रॉफिक जंक्शन, रोडवर इ. विविध ठिकाणी फिरत आहेत आणि वाहनचालक आणि इतर जाणाऱ्या प्रवाशांना, नागरिकांना त्रास देऊन पैसे देण्यास भाग पाडत आहेत, याची पोलीस प्रशासनाचे गंभीर दखल घेतली असून अशा प्रकारचे उपद्रव रोखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम 163 अन्वये अन्वये पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येत्या दि.१६ ऑक्टोंबर ते दि.१५डिसेंबर पर्यंत असे कृत्य करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis