छत्रपती संभाजीनगर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। वैजापूर आगारासाठी नवीन 5 बसेस प्राप्त झाल्याने मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरणारे यांच्या हस्ते पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नवीन 15 ‘लालपरी’ बसेसची मागणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 5 बसेस मिळाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 5 बसेस वैजापुर आगारासाठी प्राप्त झाल्या असून त्यांचे लोकार्पण आमदार बोरनारे यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, कामगार तसेच वयोवृद्ध नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर व सुरक्षित व्हावा, यासाठी ही विशेष पुढाकार घेतला. या मागणीची दखल घेत परिवहन विभागाने एकूण 15 नवीन बसेस देण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 10 बसेस आगारात दाखल झाल्या आहेत आणि उर्वरित 5 बसेसही लवकरच मिळणार असल्याचे सांगितले.
नवीन ‘लालपरी’ बसस्थानकात दाखल होताच वैजापुरकरांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान झळकत होते. या लोकार्पण सोहळ्यास महायुतीचे मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिवहन विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis