अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांचा हे दि. 27 ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा खालीलप्रमाणे : आयोगाचे सदस्य डॉ. अंबादास मोहिते, डॉ. गजानन खराटे, डॉ. निलिमा सरप लखाडे हे आयोगाच्या कामकाजासाठी येतील. दि. 26 ऑक्टोबरला सायं. 5 वा. विश्रामगृह व आगमन, सोमवार, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजता अकोला येथील कान्हेरी गवळी ता. अकोला येथे हिंदू गवळी या जातिसमूहाची क्षेत्र पाहणी, दुपारी 3 ते 5.30 अकोला जिल्ह्यातील आश्रमशाळेस भेट. सायंकाळी 6.30 शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. मंगळवार दि. 28 ऑक्टोबर सकाळी 7 वाजता पुणे येथे मुख्यालयाकडे रवाना.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे