अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून वार्षिक योजनेचा आढावा!
अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यात अनेक कामांच्या प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही प्रलंबित आहे. विकासकामांना चालना मिळण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, तसेच नाविन्यपूर्ण कामांचे प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश
P


अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

जिल्ह्यात अनेक कामांच्या प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही प्रलंबित आहे. विकासकामांना चालना मिळण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, तसेच नाविन्यपूर्ण कामांचे प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. एम. जी. वाठ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात सुमारे १६८ कोटी रू. च्या प्रशासकीय मान्यताची कार्यवाही झाली आहे. तथापि, अनेक विभागाच्या यंत्रणांकडील प्र. मा. व तांत्रिक मान्यताही अद्याप अपूर्ण आहेत. ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करून प्राप्त निधीनुसार कामांना चालना द्यावी. तांची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. वारंवार फॉलोअप घेण्याची गरज पडू नये. आर्थिक वर्ष संपताना ऐनवेळी मान्यतांअभावी कामे रखडणे आणि निधी परत जाणे असे कदापि घडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. नाविन्यपूर्ण कामांचे प्रस्ताव देण्याचे निर्देशही त्यांनी केले.

जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते, शाळा, पशुसंवर्धन योजना, क्रीडा योजना, रूग्णालय बांधकाम व दुरुस्ती, सामाजिक न्याय योजना, महापालिका, नगरपालिकांतर्गत कामे आदी विविध बाबींचा आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला. श्री. सोनखासकर यांनी सादरीकरण केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande