मुंबई, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। हिंदुजा ग्रुपची प्रमुख भारतीय कंपनी आणि कमर्शियल उपयोगाच्या गाड्या बनवणारी, देशातील आघाडीची कंपनी, अशोक लेलँडने आज घोषणा केली की, त्यांनी मेसर्स एएसएटी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडला एव्हीटीआर ५५टी इलेक्ट्रिक ट्रक्सच्या २४ युनिट्सची डिलिव्हरी देणे सुरु केले आहे. एएसएटी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, सिमेंट आणि ऍग्रीगेट्सच्या वाहतुकीच्या उद्योगातील एक प्रमुख कंपनी आणि श्री सिमेंटची धोरणात्मक भागीदार आहे. अशोक लेलँडने आज केलेली घोषणा त्यांच्या आणि एएसएटी लॉजिस्टिक्सदरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यासोबतच नाविन्यपूर्ण, अत्याधुनिक इलेक्ट्रिक ट्रक तयार करून पर्यावरण आणि समाजासाठी अनुकूल वाहतुकीला पुढे नेण्याप्रती अशोक लेलँडची वचनबद्धता यामध्ये अधोरेखित झाली आहे.
४ ट्रक्सच्या पहिल्या बॅचच्या चाव्या अशोक लेलँडचे प्रेसिडेंट - एमएचसीव्ही, श्री संजीव कुमार यांनी एएसएटी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ, श्री अरविंद सारडा यांना सुपूर्द केल्या. इतर अनेक वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
अशोक लेलँडचे प्रेसिडेंट - एमएचसीव्ही, श्री संजीव कुमार म्हणाले, आमच्या एव्हीटीआर ५५टी इलेक्ट्रिक ट्रक्सच्या ४ युनिट्सची पहिली बॅच एएसएटी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडला सुपूर्द करताना आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. हे ट्रक्स कमर्शियल गाड्यांच्या उद्योगामध्ये नावीन्य, पर्यावरणपूरकता आणि कामगिरीप्रती आमची बांधिलकी ठळकपणे दर्शवतात. ही भागीदारी आमच्या इलेक्ट्रिक वाहतूक उत्पादनांवर ग्राहकांचा विश्वास वाढत असल्याचे द्योतक आहे आणि लॉजिस्टिक्स इकोसिस्टिममधील टेक्नॉलॉजी लीडर हे आमचे स्थान अधिक मजबूत करते. आम्ही शुद्ध वाहतुकीच्या सीमा रुंदावत आहोत, त्यासोबतच विश्वसनीय, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज मोबिलिटी उत्पादने प्रदान करण्यावर देखील आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
श्री सिमेंटची धोरणात्मक लॉजिस्टिक्स भागीदार, एएसएटी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे श्री अरविंद सारडा यांनी सांगितले, अशोक लेलँडच्या ट्रक्सची गुणवत्ता आणि कामगिरी यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. श्री सिमेंटसोबत आम्ही एका अशा मार्गावर वाटचाल करत आहोत, जो अधिक शुद्ध, अधिक कार्यक्षम आणि पर्यावरण, समाजासाठी अनुकूल भविष्याच्या दिशेने जातो. प्रगत तंत्रज्ञान असलेले एव्हीटीआर ५५टी इलेक्ट्रिक ट्रक डिलिव्हर करण्यासाठी, तसेच पर्यावरणानुकूल वाहतूक इकोसिस्टिम निर्माण करण्याप्रती आमची वचनबद्धता मजबूत करण्यात आम्हाला सक्षम बनवल्याबद्दल आम्ही अशोक लेलँडचे आभारी आहोत. अशोक लेलँडचे नावीन्याप्रती समर्पण आणि आमचा लॉजिस्टिक्सबाबतचा दूरदर्शी दृष्टिकोन यांच्यासह आम्ही सातत्यपूर्ण यश संपादन करत राहू.
अशोक लेलँडच्या इलेक्ट्रिक गाड्या सर्वात जास्त कार्यक्षमता, पर्यावरण आणि समाजासाठी अनुकूलता व प्रगत तंत्रज्ञानासह गाडी ओनरशिपचा सर्वात कमी खर्च देण्यासाठी डिझाईन केल्या जातात. या गाड्यांमध्ये लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञान, ड्युअल-गन चार्जिंग आहे आणि या गाड्या उद्योगक्षेत्राच्या मानकानुसार असलेल्या ट्रेलर आणि सुपरस्ट्रक्चरसाठी पूर्णपणे अनुकूल आहेत. त्यामुळे त्या ताफ्यामध्ये सहज आणि पूर्णपणे सामावल्या जाऊ शकतात. त्याखेरीज त्यांच्यात प्रीमियम केबिन, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, टेलिमॅटिक्स आणि ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम्स (एडीएएस) आणि सर्वसमावेशक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
या प्रगत इलेक्ट्रिक गाड्यांची डिलिव्हरी अशोक लेलँडच्या कमर्शियल वाहतुकीमध्ये परिवर्तन आणण्याच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही कंपनी पर्यावरणानुकूल वाहतुकीसाठी बांधील आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पर्यावरण व समाजासाठी अनुकूल वाहतुकीच्या भविष्याला आकार देत आहे. भारताच्या लॉजिस्टिक्स आणि वाहतूक इकोसिस्टिमचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात देखील ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर