म्युझियम ऑफ सोल्युशन्सकडून व्रुमचे उद्घाटन
मुंबई, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) ने VROOM चे अनावरण केले. हा मुलांसाठी अत्यंत अनोखा अनुभव आहे. भारतातील पहिलाच इमर्सिव्ह ऑटोमोटिव्ह अनुभव आहे, जो विशेषतः मुलांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. म्युझियम ऑफ सोल्युशन्सची संकल्पना
मुंबई


मुंबई, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) ने VROOM चे अनावरण केले. हा मुलांसाठी अत्यंत अनोखा अनुभव आहे. भारतातील पहिलाच इमर्सिव्ह ऑटोमोटिव्ह अनुभव आहे, जो विशेषतः मुलांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. म्युझियम ऑफ सोल्युशन्सची संकल्पना असलेल्या या उपक्रमाला प्लॅनेट ऑटोचे सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनाची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की, यात तरुण तसेच मोठी माणसे केवळ प्रेक्षक म्हणून नव्हे तर विद्यार्थी म्हणून काही शिकण्यासाठी किंवा आपली जिज्ञासा शमवण्यासाठी म्हणून ऑटोमोबाईलच्या जगात प्रवेश करतात.

6,000 चौरस फुटांवर पसरलेले VROOM संग्रहालयाच्या संपूर्ण मजल्याला एका खऱ्याखुऱ्या गॅरेजचा लूक देते. ही एक अशी जागा आहे जिथे उत्सुकता आणि निर्मिती यांची भेट होते. विज्ञान, डिझाइन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयुष्यातील महत्त्व समजून घेण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. त्यामुळेच या प्रदर्शनात परस्परसंवादी झोन, कार्यरत मॉडेल्स आणि प्रत्यक्षात काहीतरी अनुभव मिळेल, अशीच याची रचना केली आहे. याचा प्रत्येक कोपरा या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना समजून घेण्यासाठी, प्रत्यक्षात काहीतरी शिकण्यासाठी आणि स्वप्न पाहण्यासाठी प्रेरित करतो.

आपल्या नवोन्मेषी भागीदारांच्या पाठिंब्यामुळे VROOM प्रत्यक्षात अनुभवता येते आहे. यातील प्रत्येकाने या अनुभवात त्यांची कौशल्ये आणि काही न काही वैशिष्ट्य जोडले आहे. ऑटोमोबाईलचा इतिहास मर्सिडीज-बेंझपासून सुरू होतो आणि प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना जगातील पहिली ऑटोमोबाईल - बेंझ पेटंट-मोटरवॅगन - AMG कारसह पाहण्याची संधी मिळेल. मर्सिडीज-बेंझ इंडिया मेकॅनिकल बेला देखील ऊर्जा देते, ज्यामुळे प्रेक्षकांना खऱ्याखुऱ्या कारखाली रेंगाळून इलेक्ट्रिक कारचे घटक एक्सप्लोर करण्याची आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे साक्षीदार होण्याची संधी मिळते.

या गॅरेजला मोटुलमुळे ऊर्जा मिळते. उच्च-कार्यक्षमता असलेल्या इंजिन ऑइलमागील विज्ञान आणि अचूकता यामुळे लक्षात येते. तर जगातील काही उत्कृष्ट विंटेज कार प्रदर्शनासाठी आणून आणि या प्रदर्शनात प्रेक्षकांना रस्ता सुरक्षेबद्दल शिक्षित करून WIAA व्रुमचे आकर्षण वाढवते. एकत्रितपणे, हे भागीदार VROOM ला एका अशा जागेत रूपांतरित करतात जिथे प्रत्येक वळणावर उत्सुकता, शिक्षण आणि नावीन्य अनुभवता येते.

प्रदर्शनाबद्दल MuSo च्या सीईओ आणि संस्थापक तन्वी जिंदाल शेटे म्हणाल्या, “मुलांमध्ये उत्सुकता आणि सर्जनशीलता निर्माण करण्यासाठी आम्ही MuSo मध्ये कशा पद्धतीने प्रयत्नशील असतो, याचे होते व्रुम हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. आमचा असा विश्वास आहे की MuSo ही अशा अनुभवांची जागा आहे, जिथे प्रत्यक्ष अनुभवांद्वारे शिक्षण घेता येते आणि जिथे कल्पनाशक्तीला खरोखरच मर्यादा नसते. Vroom हा विश्वास अधिक दृढ करतो. हे एक असा पहिलाच ऑटोमोटिव्ह अनुभव देते जो प्रेक्षकांना अभियांत्रिकी एक्सप्लोर करण्यासाठी, टिंकर करण्यास तसेच प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देते. प्लॅनेट ऑटोसोबत भागीदारी करून हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास आणि मुंबईतच हा अनुभव उपलब्ध करून देण्यात आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे.”

या सहकार्याच्या भावनेबद्दल अधिक स्पष्टता देत प्लॅनेट ऑटोचे सीईओ विक्रम मेहता म्हणाले, “कारप्रेमी म्हणून, आम्ही नेहमीच अशा जागेचे स्वप्न पाहिले आहे जिथे लोक खरोखरच ऑटोमोबाईल्सची जादू अनुभवू शकतील. आतापर्यंत भारतात असा अनुभव घेण्याची कसलीही संधी नव्हती. पण MuSo मधील Vroom हे सर्व वयोगटातील पाहुण्यांना करशी संपूर्णपणे जोडण्याची संधी देते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी MuSo सोबत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि Vroom ला खरोखरच खास अनुभव बनवण्यास मदत केल्याबद्दल आमचे भागीदार Motul, Mercedes आणि WIAA चे आम्ही आभारी आहोत.”

शाळा, कुटुंबे आणि सर्वसामान्य लोकांसाठी हे VROOM 16 ऑक्टोबर 2025 पासून खुले होणार आहे. museumofsolutions.in वर ऑनलाइन किंवा थेट MuSo काउंटरवर तिकिटे खरेदी करून प्रेक्षक या प्रदर्शनाला भेट देऊ शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande