दिवाळीसाठी गोदरेज एअर मॅटिककडून स्वयंचलित होम फ्रेशनरची नवी रेंज सादर
मुंबई, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीने गोदरेज एअर हा ब्रँण्ड सुरु केला आहे. या ब्रॅँण्डकडून घरात सुगंध दरवळण्यासाठी स्वयंचलित रुम फ्रेशनसची निर्मिती केली जाते. गोदरेज एअर या ब्रँण्डने अल्पावधीतच देशा
दिवाळीसाठी गोदरेज एअर मॅटिककडून स्वयंचलिक होम फ्रेशनरची नवी रेंज


मुंबई, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीने गोदरेज एअर हा ब्रँण्ड सुरु केला आहे. या ब्रॅँण्डकडून घरात सुगंध दरवळण्यासाठी स्वयंचलित रुम फ्रेशनसची निर्मिती केली जाते. गोदरेज एअर या ब्रँण्डने अल्पावधीतच देशातील अग्रगण्य रुम फ्रेशनर ब्रँण्डचा किताब मिळवला. गोदरेज एअरने आता तस्वयंचलित रुम फ्रेशनरमध्ये वेगवेगळ्या रेंज उपलब्ध केल्या आहेत. गोदरेज एअरकडून खास दिवाळीसाठी गोदरेज एअर मॅटिक रॉयल ही नवी रेंज बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे. या स्वयंचलित रुम फ्रेशनरला रोज-गोल्ड फिनिश देण्यात आला आहे. या फ्रेशनरमुळे घराच्या सजावटीत नवी आकर्षक भर पडली आहे. यात वॉर्म व्हॅनिला या आकर्षक सुगंधाचा वापर केला जातो. वॉर्म व्हॅनिलाच्या सुगंधाने घरात उबदार आणि चैतन्यमयी वातावरण निर्माण होते. या नवीन उत्पादनामुळे, गोदरेज एअरने एअर केअर म्हणजेच सुगंधित वातावरण निर्मितीला केवळ दैनंदिन गरज म्हणून मर्यादित न ठेवता, भारतीय घरांसाठी सणासुदीचे खास ऐश्वर्यपूर्ण उत्पादन म्हणून स्थान दिले आहे.

देशातील पश्चिमेकडील भागांत एअर फ्रेशनरची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ही बाजारपेठ वेगाने उद्यास येत आहे. सद्यस्थितीत बाजारात एअर फ्रेशनची आर्थिक उलाढाल तब्बल ४०० कोटींहून अधिक झाली आहे. देशभरात वापरल्या जाणा-या एअरफ्रेशनरचा वापर पाहता केवळ पश्चिम भागांत ४० टक्के लोक एअर फ्रेशनर आवर्जून वापरतात. सणासुदीच्या काळात या भागांतील मागण्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ होते.

गोदरेज एअर मॅटिक रॉयल फेस्टिव्ह इनेन्स हे एअर केअर उत्पादन आता रोजच्या वापरापलीकडेही उपयोगी ठरले आहे. हे उत्पादन शहरातील ग्राहकांना तसेच सणासुदीसाठी खास खरेदी करणा-यांचे आवडते उत्पादन झाले आहे. हे उपकरण घराच्या सजावटीत सहज मिसळून जावे,यासाठी खास डिझाइन केले आहे. गोदरेज एअर मॅटिक रॉयल फेस्टिव्ह इसेन्स घरात कुठेही सहज ठेवता येते. त्याकरिता या स्वयंचलित एअर फ्रेशनरला इन-बिल्ट-स्टँण्ड दिला आहे. हे उपकरण भिंतीवरही लावण्याचीही सोय उपलब्ध आहे. यातील वॉर्म व्हॅनिला सुगंधामध्ये रिच व्हॅनिला आणि फुले या दोन्हींच्या सुगंधाचा सुंदर मिलाफ आहे. नव्या एअर फ्रेशनच्या वापराने घर अधिक सुगंधित आणि ताजेतवाने वाटते. उपकरणातील प्रत्येक रिफिल २ हजार २०० पर्यंत फवारे देते. सर्वात कमी सेटिंगवरही उपकरणातील सुगंधित द्रव्य दोन महिन्यांपर्यंत टिकते. वापरकर्त्याला १०,२० किंवा ४० मिनिटांच्या अंतराने उपकरणातील फवारा घरात स्वयंचलितरित्या स्प्रे करता येईल. काही विशिष्ठ कालावधीनंतर घरात पुन्हा सुगंध दरवळू लागत असल्याने घरात ताजेपणा टिकून राहतो.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय श्रेणी प्रमुख अश्विन मूर्ती यांनी नव्या उपकरणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “उत्पादनाची रचना आणि सुगंधांच्या रेजंमध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण बदल केल्याने गेल्या तीन-चार वर्षांत आमच्या एअर केअर विभागाने भारतात दोन अंकी वाढ नोंदवली आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात सजावटीसाठी खास मेहनत घेतली जाते. वेगवेगळ्या उत्पादनांची खरेदी करण्यासाठी गुंतवणूक केली जाते. आम्ही पहिल्यांदाच संपूर्ण भारतात सणवारीत वापरता येईल असे फेस्टिव्ह मॅटिक उत्पादन आणले आहे. नव्या उत्पादनात वॉर्म व्हॅनिला या मनमोहक सुगंधी द्रव्याचा वापर केल्याने उत्सवकाळात ताजेपणाचा सुगंध दरवळतो. सणानिमित्ताने एकत्र येणा-यांना एकात्मकतेची भावना निर्माण होण्यास सकारात्मकता मिळते. गोदरेज एअर मॅटिक रॉयल फेस्टिव्ह एसेन्सद्वारे घरातील वातावरण आनंदमयी राहावे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. दिवाळीसाठी ही भेटवस्तू म्हणूनही देता येईल. बाजारातील हा नवा ब्रँण्ड उत्पादनांच्या श्रेणीसाठी महत्त्वचा उत्सवी पर्याय ठरेल.”

केवळ पाचशे एकोणपन्नास रुपयांत गोदरेज एअऱ मॅटिक रॉयल फेस्टिव्ह इसेन्स उपलब्ध आहे. हे उत्पादन आता सर्व स्टोअर्स, किरकोळ दुकाने तसेच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande