नाशिक - प्रदेशाध्यक्षांसमोर भाजपा पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी
नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आठ दिवसातच नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपली भूमिक
नाशिक - प्रदेशाध्यक्षांसमोर भाजपा पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी


नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आठ दिवसातच नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना प्रदेशाध्यक्षांकडे महायुतीपेक्षा स्वबळावर लढण्याचा आग्रह धरल्याने याबाबत आता काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील आठवड्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्रातील मंत्री आमदार खासदार व इतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करताना शक्य तिथे महायुती बरोबर लढू नाहीतर एकट लढू असे सांगितले होते नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या या बैठकीला आठ दिवस होत नाही तोच पुन्हा एकदा नाशिकमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार , व इतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे ,जळगाव, अहमदनगर, नंदुरबार , या पाच जिल्ह्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. नाशिक मध्ये आलेल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे गुरुवारी आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार, जिल्हाध्यक्ष यांनी केले‌ . माजी मंत्री सुभाष भामरे, भारती पवार, आ.विजयकुमार गावित , आ. दिलीप बोरसे, आ.देवयानी फरांदे, राहुल आहेर, वैभव पिचड,अमृता पवार , जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, यआ.देवयानी फरांदे, राहुल आहेर, यतीन कदम, मालेगाव शहर अध्यक्ष देवा पाटील, धुळे माजी महापौर प्रदीप कर्पे, धुळे शहराध्यक्ष हिलाल माळी, आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते .

बैठकीमध्ये नगरपालिका महानगरपालिकेचा प्रभाग निहः आढावा घेण्यात आला तर जिल्हा परिषदेच्या गट आणि गण यामध्ये काय परिस्थिती असेल याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना महायुतीपेक्षा स्वतंत्र लढण्याची मागणी केली आहे यावर प्रदेशाध्यक्षांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पदाधिकाऱ्यांशी यावर त्यांनी बोलणे देखील टाळले आहे त्यामुळे आता भाजपा एक ला चलो रे ची भूमिका घेतो का किंवा वेगळी भूमिका घेता याबाबतचा निर्णय आता प्रदेश स्तरावर्तित होणार आहे असे जवळपास निश्चित झालेले आहे.

प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक मध्ये बैठक घेऊन उत्तर महाराष्ट्रात निवडणुकीची काय रणनीती असेल याबाबत चर्चा केली पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतलं नगरपालिका महानगरपालिका यांच्याबाबत वॉर्डनिहाय चर्चा करून तिथे काय परिस्थिती आहे भाजपाचे उमेदवार कसे निवडून येतील यावर चर्चा केली पुढील रणनीती ही अर्थातच मुंबईमध्ये फायनल होणार आहे पण या ठिकाणी कोणती रणनितीचा उपयोग करावा याबाबत प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या.

पदाधिकाऱ्यांनी आमदारांना स्वातंत्र्य द्या त्यांचे मत विचारात घ्या अशा स्वरूपाची सूचना देखील केलेली आहे तर नाशिक मध्ये नाशिक रोड देवळाली या भागामध्ये भाजप महायुतीच्या मित्रपक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना सुध्दा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वेगळ्या लक्ष देण्याची सूचना देखील केली आहे तर या बैठकीमध्ये नाशिक मधील एका महिला आमदाराने महापालिका आयुक्त यांनी आम्ही सांगू तसे वॉर्ड केले नाही अशी तक्रार देखील केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande