अमरावती - सिद्धार्थनगरातून प्रतिबंधित चायना मांजा जप्त
अमरावती, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। स्थानिक सिध्दार्थनगर येथील सिव्हिल लाईन येथील एका इसमाच्या घरातून ३० हजार रूपये किमतीचा प्रतिबंधित चायना मांजा जप्त करण्यात आला. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. रवींद्र लल्लुसिंग चव्हाण (वय ५२, रा. सिद्धार्थ
सिद्धार्थनगरातून प्रतिबंधित चायना मांजा जप्त


अमरावती, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)।

स्थानिक सिध्दार्थनगर येथील सिव्हिल लाईन येथील एका इसमाच्या घरातून ३० हजार रूपये किमतीचा प्रतिबंधित चायना मांजा जप्त करण्यात आला. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

रवींद्र लल्लुसिंग चव्हाण (वय ५२, रा. सिद्धार्थनगर, सिव्हिल लाईन, अमरावती), असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या राहत्या घरातून एका खाकी बॉक्समधून प्रतिबंधित चायना ठेवण्यात आलेला होता. तो घरून मांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसाना प्राप्त झाली होती. त्याच्या ताब्यामधून ३० नग मोनोफिल गोल्ड कंपनीचे प्रतिबंधित चायना मांजा किंमत अंदाजे ३० हजार रुपये, असा मुद्देमाल जप्त व त्याच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande