आत्मसमर्पित माओवाद्यांना ‘लॉयड्स मेटल्स’ने दिला रोजगार
- मुख्यमंत्र्यांकडून ''पुनर्वसन मॉडेल''चे कौतुक गडचिरोली, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : एकेकाळी नक्षलवादाने त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता विकासाची आणि विश्वासाची नवी पहाट उगवली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थि
लॉर्ड्स मेटल ने नक्षलवाद्यांना दिले रोजगार


- मुख्यमंत्र्यांकडून 'पुनर्वसन मॉडेल'चे कौतुक

गडचिरोली, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : एकेकाळी नक्षलवादाने त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता विकासाची आणि विश्वासाची नवी पहाट उगवली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज साठ माओवाद्यांनी सामूहिक आत्मसमर्पण करून, शस्त्रे टाकून शांततेचा मार्ग स्वीकारला. या आत्मसमर्पणाला अधिक बळ मिळाले ते लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) कंपनीने राबवलेल्या यशस्वी पुनर्वसन उपक्रमामुळे!

६८ नक्षलवाद्यांना मिळाली नवी ओळख!

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एलएमईएलने सरकार आणि पोलिसांच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने आतापर्यंत ६८ आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना आणि माओवादी हिंसाचाराने बाधित १४ कुटुंबातील सदस्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शिक्षण मर्यादित असले तरी, कंपनीने कोनसरी येथील 'लॉईड्स कौशल्य विकास केंद्रात' तांत्रिक प्रशिक्षण देऊन या लोकांना प्रशासकीय, बांधकाम आणि यांत्रिक कामांसाठी तयार केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून लॉयड्स मेटल्सचे कौतुक

बुधवारी गडचिरोली पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी एलएमईएलच्या या योगदानाची विशेष प्रशंसा केली. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना नोकऱ्या देऊन लॉयड्स मेटल्सने आदर्श निर्माण केला आहे. आत्मसमर्पित इच्छुकांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी देण्याचे आश्वासन व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रभाकरन यांनी दिले आहे, असे ते म्हणाले.

रोजगार आणि समृद्धीचे केंद्र गडचिरोली!

लॉयड्स मेटल्स एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज खाणी आणि कोनसरी येथील डी.आर.आय. प्लांट चालवते. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळत आहे. कंपनीने 'एल टी गोंडवाना स्किल हब'द्वारे जुलै २०२५ पर्यंत सुमारे १,४०० स्थानिक तरुणांना प्रशिक्षित केले असून, सध्या शेकडो तरुण प्रशिक्षण घेत आहेत.

एक काळ जो औद्योगिक विकासासाठी आव्हान होता, तो गडचिरोली जिल्हा आता उद्योग, सरकार आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयाने शाश्वत विकास आणि अर्थपूर्ण संधींचे केंद्र बनत आहे. लॉयड्स मेटल्सचे हे 'पुनर्वसन मॉडेल' नक्षलग्रस्त भागातील विकासासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे!

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande