बीड, 16 ऑक्टोबर (हिं.स.) -
अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.१७ ऑक्टोबर रोजी बीड येथे सकल ओबीसी - भटके विमुक्त महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी बीडमध्ये सुरू आहे विशेष म्हणजे ओबीसी समाज बांधव मोठ्या प्रमाणात जमा होणार आहे या पार्श्वभूमीवर मेळाव्याला ओबीसी समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, यासाठी
श्री सुघोष भैया मुंढे,श्री परमेश्वर महाराज वाघमोडे,राजेंद्र विटकर, बापू गाडेकर यांनी मौजे गोविंद वाडी,
केकत पंगरी, रोहितल,डोईफोडवाडी याठिकाणी जाऊन ओबीसी व भटके विमुक्त मुस्लिम मागासवर्गीय समाजाला सभेला येण्या साठी प्रबोधन व उपस्थित राहण्या साठी बैठका घेतल्या आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis