बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची केज तालुक्यात बैठक
बीड, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने केज तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) केज तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ने
अ


बीड, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने केज तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) केज तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेतृत्व यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.ही बैठक येडेश्वरी साखर कारखाना, आनंदगाव (सा.) येथे आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खासदार बजरंग बप्पा सोनवणे, माजी आमदार अ‍ॅड. संगिता ताई ठोंबरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, तसेच तालुकाध्यक्ष शंकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन झाले.या बैठकीला केज तालुक्यातील विविध गावांमधील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 लक्षात घेता संघटनात्मक तयारी, बूथ स्तरावर पक्षबांधणी, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क मोहिम, आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रसार यावर सविस्तर चर्चा झाली.

सर्व कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत एकदिलाने पक्ष मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.या बैठकीत मार्गदर्शन करत सांगितले की “पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम केले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासाचं प्रतीक बनवणं हीच आपली प्राथमिक जबाबदारी आहे.”

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande