फिलीपिन्सच्या मिंडानाओ भागात ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
मनिला, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।फिलिपिन्समध्ये शुक्रवारी (17 ऑक्टोबर) मिंडानाओ प्रदेशात पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनुसार, या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्म
पश्चिम नेपाळमध्ये भूकंप


मनिला, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।फिलिपिन्समध्ये शुक्रवारी (17 ऑक्टोबर) मिंडानाओ प्रदेशात पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनुसार, या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर नुसार, हा भूकंप जमिनीपासून 62 किलोमीटर खोलीवर झाला होता. दरम्यान, एक आठवड्यापूर्वीही याच मिंडानाओ प्रदेशात 7.5 तीव्रतेचा प्रचंड भूकंप झाला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला होता.

फिलिपिन्सच्या मिंडानाओ भागात जाणवलेल्या या भूकंपामुळे अनेक शाळा आणि एक रुग्णालयाचे इमारतींचे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपामुळे नागरिकांना उघड्यावर रात्र काढण्याची वेळ आली. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, प्रभावित भागांमध्ये वैद्यकीय पथके पाठवण्यात येत आहेत.

भूकंपानंतर त्वरित मिंडानाओमध्ये सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता, कारण धक्के अत्यंत तीव्र होते. धोकादायक लाटांचा धोका व्यक्त करण्यात आला होता आणि किनारपट्टीच्या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मात्र काही तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यावर हा इशारा मागे घेण्यात आला.

दावाओ सिटी, जिथे सुमारे 54 लाख लोकसंख्या आहे, हा भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून सर्वात जवळ होता. येथे शाळा आणि शासकीय कार्यालये रिकामी करण्यात आली आणि नागरिकांना उंच भागांमध्ये जाण्याचे निर्देश देण्यात आले. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, सध्या आफ्टरशॉक्स येण्याची शक्यता कायम आहे.

फिलिपिन्स हे प्रशांत महासागरातील “रिंग ऑफ फायर” या भागात स्थित आहे, जो जगातील सर्वाधिक भूकंप-संवेदनशील क्षेत्रांपैकी एक मानला जातो. येथे दरवर्षी डझनावारी लहान-मोठे भूकंप होतात, ज्यामुळे अनेकदा सुनामीचा धोका देखील निर्माण होतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande