सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप, ट्रम्प प्रशासनाविरोधात हजारो लोक रस्त्यावर
वॉशिंग्टन, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि इतर अनेक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरून एकत्रितपणे आंदोलन करत आहेत. हे आंदोलन डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर आणि त्यांच्या ‘सत्तावादी वृत्ती’विरोधात करण्यात आले. या मोहिमेचे नाव ‘न
अमेरिकेत ट्रम्प यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करत हजारो लोक रस्त्यावर उतरले


वॉशिंग्टन, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि इतर अनेक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरून एकत्रितपणे आंदोलन करत आहेत. हे आंदोलन डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर आणि त्यांच्या ‘सत्तावादी वृत्ती’विरोधात करण्यात आले. या मोहिमेचे नाव ‘नो किंग्स’ ठेवण्यात आले आहे, ज्याचा अर्थ आहे कि, आम्ही कोणत्याही राजाला मान्य करत नाही. हे आंदोलन अमेरिका, युरोप आणि आशिया खंडांमध्येही पसरले आहे. या आंदोलनांना रिपब्लिकन पक्षाने ‘हेट अमेरिका’ म्हणजेच ‘अमेरिकेविरोधी’ आंदोलन असे म्हणत नाकारले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये शनिवारी (१८ ऑक्टोबर) अमेरिकन दूतावासासमोर शेकडो लोक ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांच्या विरोधात एकत्र आले. आंदोलकांचे म्हणणे होते की, ते राष्ट्रपतींच्या वाढत्या हुकूमशाही वागणुकीविरोधात आणि लोकशाही संस्थांवर निर्माण होणाऱ्या धोक्याविरोधात उभे आहेत. आंदोलन आयोजकांनी सांगितले की दिवस संपेपर्यंत लाखो लोक अमेरिकेच्या मोठ्या शहरांपासून लहान गावांपर्यंत या आंदोलनात सहभागी होऊ शकतात. इतकेच नव्हे तर परदेशातील काही शहरांमध्येही या आंदोलनाच्या समर्थनात लोक रस्त्यावर उतरू शकतात.

वॉशिंग्टनमध्ये आंदोलकांनी रस्त्यांवर रॅल्या काढल्या आणि अमेरिकन संसद भवनकडे मोर्चा वळवला. माहितीनुसार, या आंदोलनाचं वातावरण एका सणासारखा होता. लोकांच्या हातात पोस्टर्स, अमेरिकेचे झेंडे आणि फुगे होते. काही लोक तर विशेष प्रकारच्या वेशभूषेतही सहभागी झाले होते.फक्त वॉशिंग्टनमध्येच नव्हे, तर न्यूयॉर्क, बोस्टन, शिकागो आणि अटलांटा यांसारख्या शहरांमध्येही या रॅलींना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

जून महिन्यात ‘नो किंग्स’ या नावाने या आंदोलनाची पहिली मोठी सुरुवात झाली होती. सध्या हे आंदोलन पुन्हा वेग घेत आहे, कारण ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच काही वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. यामध्ये राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करणे, स्थलांतर करणाऱ्यांवर छापेमारी, आणि अनेक अमेरिकी शहरांमध्ये फेडरल दलांची तैनाती यांचा समावेश आहे.

ट्रम्प यांनी या विरोध प्रदर्शनांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांना “राजा” म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी हेही सांगितले की हे आंदोलन पूर्णपणे राजकीय प्रेरित आहे आणि यामुळे देशाची प्रतिमा खराब होत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी देखील या विरोध प्रदर्शनांची टीका करत त्याला “अँटी-अमेरिका” (अमेरिकेविरोधी) मोहिम असे म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande