विश्वचषक विजेता माजी कर्णधार पॉल कॉलिंगवुड सापडला वादाच्या भोवऱ्यात
लंडन , 17 ऑक्टोबर (हिं.स.)।इंग्लंडचा पहिला विश्वचषक विजेता कर्णधार आणि माजी प्रशिक्षक पॉल कॉलिंगवुड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 49 वर्षीय कॉलिंगवुड याने निवृत्तीनंतर इंग्लंड क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये महत्त्वाचे योगदान दिले होते. मा
विश्वचषक विजेता माजी प्रशिक्षक पॉल कॉलिंगवुड  क्रिकेटपटूवर गंभीर आरोप


लंडन , 17 ऑक्टोबर (हिं.स.)।इंग्लंडचा पहिला विश्वचषक विजेता कर्णधार आणि माजी प्रशिक्षक पॉल कॉलिंगवुड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 49 वर्षीय कॉलिंगवुड याने निवृत्तीनंतर इंग्लंड क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये महत्त्वाचे योगदान दिले होते. मात्र आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी ) भविष्यातील योजनांमधून त्याचे नाव वगळण्यात आले आहे. त्याच्या अनुपस्थितीमागे त्यांचे वैयक्तिक आयुष्य व कायदेशीर अडचणी हे मुख्य कारण आहे.

कॉलिंगवुड मे 2025 पासून कोणत्याही राष्ट्रीय कोचिंग कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत. त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध नॉटिंघममध्ये होणाऱ्या टेस्ट सामन्यापासूनही वैयक्तिक कारण देत माघार घेतली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, येणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेसाठीही त्यांची निवड होणार नाही. एप्रिल 2023 पासून कॉलिंगवुड यांच्याविरोधात लैंगिक वर्तन आणि अयोग्य संबंधांबाबत वाद सुरू आहेत. माजी सहकारी ग्रेम स्वान यांनी एका पॉडकास्टमध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंगचा उल्लेख केला, ज्यात कॉलिंगवुड दीर्घकाळ महिला सहवासात असल्याचे म्हटले जात आहे. या ऑडिओ लीकनंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली.

2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कपपूर्वी, कॉलिंगवुड केपटाऊनमधील स्ट्रिप क्लबमध्ये गेले होते, यामुळे त्यांना £1,000 चा दंड ठोठावण्यात आला होता. 2022 मध्ये अ‍ॅशेस पराभवानंतर त्यांचे काही फोटो व्हायरल झाले, ज्यात त्यांना बारबाडोसच्या समुद्रकिनारी एका महिलेला चुंबन देताना पाहिले गेले. यामुळे वाद अधिक वाढला.

एचएमआरसी (युके कर विभाग) ने £196,000 (सुमारे 2 कोटी रुपये) भरपाईचा आदेश दिला आहे.कॉलिंगवुड यांनी आपल्या प्रायोजक करारांमधून मिळालेल्या उत्पन्नाची चुकीची माहिती दिली असल्याचे तपासात आढळले. त्यांनी या निर्णयाविरुद्ध अपील केले, पण कोर्टाने थेट रक्कम भरण्याचा आदेश दिला.

ईसीबीने अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण कॉलिंगवुड यांचे वाद त्यांच्या क्रिकेट करिअरवर आणि इंग्लंड क्रिकेटशी असलेल्या संबंधांवर परिणाम करत आहेत. क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या सर्व वादांमुळे त्यांच्या संघात पुनरागमनाच्या शक्यता धूसर झाल्या आहेत.

कॉलिंगवुड यांचा क्रिकेट कारकिर्द अत्यंत यशस्वी राहिला आहे.

2005 ते 2019 दरम्यान त्यांनी इंग्लंडला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले.2010 टी-20 विश्वचषकात इंग्लंडला विजेते बनवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. मात्र आता त्यांचे खासगी आयुष्य, वादग्रस्त वर्तन आणि कायदेशीर गुंतागुंत त्यांच्या प्रतिमेला सुरुंग लावत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande