तन्वी शर्माला BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक
गुवाहाटी, १९ ऑक्टोबर, (हिं.स.) युवा भारतीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माला BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. थायलंडच्या दुसऱ्या मानांकित अन्यपत फिचितप्रीचसाकने तन्वीचा १५-७, १५-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या
तन्वी शर्मा


गुवाहाटी, १९ ऑक्टोबर, (हिं.स.) युवा भारतीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माला BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. थायलंडच्या दुसऱ्या मानांकित अन्यपत फिचितप्रीचसाकने तन्वीचा १५-७, १५-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या पराभवामुळे तन्वीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

तन्वीने यापूर्वी २०२३ च्या आशियाई अंडर-१७ ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये फिचितप्रीचसाकचा पराभव केला होता. पण यावेळी थाई बॅडमिंटनपटूने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

तन्वी शर्मा आता वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारी पाचवी भारतीय बॅडमिंटनपटू बनली आहे. यापूर्वी अपर्णा पोपट (१९९६), सायना नेहवाल (२००६), सिरिल वर्मा (२०१५) आणि शंकर मुथुस्वामी (२०२२) यांनी ही कामगिरी केली होती. हे विशेष आहे की, आतापर्यंत या स्पर्धेत भारतासाठी एकमेव सुवर्णपदक २००८ मध्ये सायना नेहवालने पटकावले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande